अहेरी

महाशिवरात्री निमित्त कंकडालवार परिवाराकडून शिवभक्तांना महाप्रसाद वितरण….!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी

अहेरी : तालुक्यातील व्येंकटापुर येथे महाशिवरात्री यात्रा निमित्त काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार व त्यांच्या कुटुंबियांनी येथील प्राचीन व स्वयंभू वेंकटेश्वर स्वामी (बालाजी )मंदिरात मनोभावे पुजा – अर्चना करून बालाजी स्वामीचे दर्शन घेतले.

    यावेळी वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात महाशिवरात्री निमित्त येणारे शिवभक्त -भाविकांसाठी स्व.रामय्या पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसादचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

              यावेळी कंकडालवार परिवाराने भक्तजणांना महाप्रसाद वितरण केले. तसेच या महाप्रसादाचे आस्वाद उपस्थित शेकडो भाविक व शिवभक्तांनी घेतले.

                यावेळी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी समस्त जनतेला महाशिवरात्रीच्या मनस्वी शुभेच्छा देत स्वयंभू बालाजींच्या चरणी नतमस्तक होतं समस्त जनकल्यानार्थ मनोभावे प्रार्थना केले.

            बालाजी मंदिरात आयोजित महाशिवरात्री यात्रा व महाप्रसाद कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे समवेत पंचायत समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,आई मंदाबाई कंकडालवार,वैभवभाऊ कंकडालवार उपसरपंच ग्रामपंचायत इंदाराम,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज कंकडालवार,सरपंच अक्षय पोरतेट,चिरंजीव चीलेलवर उपसरपंच,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्या सह परिसरातील भाविक व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close