अहेरी

सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे खमनचेरु येथील आविका सहकारी संस्थेचे सभासद पद रद्द…!,

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी

*अहेरी*...तालुक्यातील खमनचेरू येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सभासद असलेले आणि माजी कॅबिनेट मंत्री व अहेरीचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे बंधू रवींद्रराव भगवंतराव आत्राम यांचे सभासद पद रद्द झाल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून त्यामुळे त्यांचे अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद देखील धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे रवींद्रराव बाबा आत्राम हे यापूर्वी खमनचेरू येथील आविका सहकारी संस्थेचे सभासद म्हणून याच गटातून बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आले होते.आता त्यांचे खमनचेरू येथील आविका सहकारी संस्थेचे सभासद पदच रद्द झाल्याने त्यांचे बाजार समितीचे सभापती पद देखील धोक्यात आलेलं आहे.

खमनचेरू आविका सहकारी संस्थेचे सभासद असलेल्या रवींद्रराव भगवंतराव आत्राम यांचे सभासद रद्द करावं म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय रामय्याजी कंकडालवार यांनी 23 मार्च 2026 ला अहेरीचे सहाय्यक निबंधक कार्यालयात सबळ पुराव्यानीशी लेखी तक्रार दाखल केले होते.

डॉ.कंकडालवार यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीवरून सहाय्यक निबंधक अहेरी यांनी अर्जदार व गैरअर्जदार आणि खमनचेरू आविका संस्थेचे सचिव यांना पूर्ण संधी देऊन त्यांचे लेखी म्हणणे ऐकून घेतले. डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचा लेखी तक्रारीवरून सहाय्यक निबंधक प्रशांत गाडे यांनी अर्जदारांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीतल्या मुद्दा क्रमांक 3 नुसार आदर्श उपविधी प्रकरण 6(17) (3)नुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रातील मूळ रहिवासी नसणे आणि पूर्ण जमीन विकणे किंवा हस्तातर करने,यानुसार श्री.रवींद्रराव भगवंतराव आत्राम हे आविका सहकारी संस्था मर्या,खमनचेरू संस्थेचे सभासद म्हणून अपात्र ठरत असल्याचे 6 एप्रिल 2026च्या आपल्या आदेशात म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close