अहेरी

नवेगावच्या समस्या मार्गी लावण्यासाठी  पुढाकार घेऊ..! युवक व ग्रामस्थ्यांना कंकडालवार यांचे आश्वासन!

  विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी.

अहेरी | एका प्रकरणात चंद्रपूर कारागृहात 52 दिवस राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची जामीनावर सुटका झाली.

सुटका झाल्याची माहिती मिळताच अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील समस्त युवकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी केवळ औपचारिक भेट न घेता,नवेगावातील युवकांनी गावातील विविध ज्वलंत समस्यांवर अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणी,शिक्षण,रोजगार आणि शेतीच्या समस्यांचा समावेश होता.

युवकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर कंकडालवार यांनी प्रत्येक समस्येवर सकारात्मक चर्चा केली आणि गावाच्या विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

संकट काळातही जनतेचा माझ्यावर विश्वास कायम राहिला,हेच माझे खरे बळ आहे.नवेगावच्या युवकांनी दाखवलेले प्रेम आणि आपुलकी मी कधीही विसरणार नाही.गावच्या प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीसाठी मी तुमच्या सोबत आहे,असे यावेळी कंकडालवार म्हणाले.

या भेटीमुळे नवेगावातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.लवकरच गावातील प्रलंबित कामांना गती मिळेल,अशी आशा यावेळी युवकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close