धार्मिकसिरोंचा

सिरोंचा येथे सकल हिंदू समाजाकडून भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन!

         विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…

सिरोंचा….. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्ताने संपूर्ण देशभरात शहरी व ग्रामीण स्तरावर विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून सकल हिंदू संमेलनाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे.

                         याच धर्तीवर इतिहासकालीन सिरोंचा शहरात सुद्धा येत्या शुक्रवारला येथील क्रिडासंकुलात हिंदुत्ववादी संघटनां कडून सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला अयोध्या येथील पूज्यवीर धर्मजा स्वामी,तेलंगणा येथील माजी प्राचार्य सत्यनारायण रेड्डी,नागपूर येथील रा.स्व.संघाचे सहप्रांत प्रचारक परीक्षित जावळे आदि मान्यवर उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन करणारं आहे.

                    या संमेलनाचे मुख्य उद्देश्य,सामाजिक समरसता वाढवणे,सनातन संस्कृतीचे जतन करणे आणि गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देणे तसेच हिंदू समाजातील जातीभेद,वर्गभेद मिटवून समस्त हिंदू समाजाला एकत्रित आणण्याचं,असे आयोजकांचं म्हणणं आहे.

                  तसेच या संमेलनात कुटुंब प्रबोधन,पर्यावरण संरक्षण, स्वदेशी जीवनशैली आणि नागरी कर्तव्यांची भावना हिंदू समाजात रुजवण्यावर सुद्धा भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

                 सिरोंचा येथे येत्या शुक्रवारी आयोजित भव्य सकल हिंदू संमेलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजेपासून शहरातील अय्यप्पा मंदिरापासून महिला-भगिनींच्या कलश यात्रेसह शहरात भव्य बाईक रॅलीद्वारे करण्यात येणार आहे.तदनंतर क्रिडासंकुलात सकाळी दहा वाजेपासून मुख्य संमेलनाला सुरुवात होणार आहे.

                आयोजकांकडून सकल हिंदू समाजाचे संमेलनाची जय्यत तयारी सुरु असून या संमेलनाला सिरोंचा शहरासह तालुक्यातील समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close