डॉक्टरेट सन्मानाबद्दल कंकडालवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेत्यांकडून सत्कार…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी
अहेरी : सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे,तळागाळातील गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने धावून जाणारे आणि जिल्ह्यात जनतेचे विश्वासू नेते म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ.अजयभाऊ ककडलवार यांना दिल्ली येथे एका कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली होती .
काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल झाल्याबद्दल अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बुधाजी सिडाम यांनी अजय कंकडालवार यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.
तसेच नुकतेच शिक्षकी पेशातून फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेले राजू आत्राम यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले.सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कंकडालवार यांना हा सन्मान मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.


