एटापल्ली येथे धान खरेदी केंद्राचे उदघाटन!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था एटापल्ली येथे आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक तथा माजी जि.प. सदस्य सैनूजी गोटा यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न झालं.
टीडीसी अंतर्गत येणारे एटापल्ली परिसरातील शेतकरी बांधवांच्या समस्या लक्षात घेऊन तात्काळ धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक म्हणून बहुमताने निवडून आल्याबद्दल सैनू गोटा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार,नगरसेवक नामदेव हिचामी,अक्षय पुन्घटी,रामा तुमराठी, दिवाकर गावडे,सेवानिवृत्त वनपाल मानापूरे जी,देवानंद हिचामी,गणेश हिचामी केंद्र चालक इंगळे,ग्रेडर,यांच्या सह केंद्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
