अहेरी

दुष्काळग्रस्त यादीतून अहेरी विधानसभा क्षेत्र गायब!सरकारविरुद्ध सगळीकडे संतापाची लाट..!

    विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. प्रतिनिधी….

अहेरी :राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.या यादीत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात दुर्गम, आदिवासीबहुल आणि शेतीप्रधान असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील तब्बल ५ तालुक्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले असल्याचा गंभीर आरोप होत आहे.यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळल्याने याची दखल घेत काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी शासन व प्रशासनाला गंभीर इशारा देत तात्काळ अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या पाचही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे.

         जर सरकारने अहेरी विधानसभा क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास सरकारविरुद्ध तीव्र जनआंदोलन उभारण्याची त्यांनी गंभीर इशारा सुद्धा दिली आहे.

     महायुती सरकारने डावललेल्या ते ५ दुर्दैवी तालुके आहेत -१) सिरोंचा,२) मुलचेरा,३) एटापल्ली,४) भामरागड आणि ५) अहेरी.हे पाचही तालुके गेल्या दोन महिन्यांपासून पावसाच्या मोठ्या खंडामुळे होरपळून निघाले आहेत. *शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे महासंकट :* अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील परिस्थिती अत्यंत विदारक आहे.जून-जुलै मध्ये पेरणी झाल्यानंतर पावसाने तब्बल २० ते २५ दिवस दडी मारली.त्यामुळे शेतात उगवलेले पीक जळून खाक झाले.शेतकऱ्याने सावकाराकडून, बँकेकडून कर्ज काढून बियाणे, खत,औषध,नांगरणीवर जो हजारो रुपयांचा खर्च केला होता,तो पूर्णपणे वाया गेला आहे.आता पुन्हा पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा नाही.हीच खरी दुबार पेरणीची वेळ आहे.अशा वेळी सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना,सरकारने यादीतूनच नाव गायब करून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्र हा आधीच नक्षलग्रस्त,दुर्गम भाग आहे.येथील शेतकरी,शेतमजूर बांधव रोजगार,शिक्षण,आरोग्य अशा अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे.अशात निसर्गानेही पाठ फिरवल्याने तो पूर्णपणे कोलमडून पडला आहे.असे असताना महायुती सरकारने त्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायम लढणारे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लोकनेते मा.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी सरकार विरुद्ध एल्गार पुकारला आहे.

त्यांनी सरकारला थेट इशारा देत म्हटले आहे की,अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा,मुलचेरा,एटापल्ली, भामरागड आणि अहेरी या पाचही तालुक्यांची वस्तुस्थिती सरकारने प्रत्यक्ष येऊन पाहावी.येथील धरणे कोरडी आहेत,शेते भेगाळली आहेत,शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात आहे.तरीही या तालुक्यांना दुष्काळ यादीतून वगळणे हा शेतकऱ्यांवरचा सर्वात मोठा अन्याय आहे.

महायुती सरकारने तात्काळ या पाचही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना हेक्टरी हजारो रुपये नुकसान भरपाई सरसकट कर्जमाफी आणि दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे-खत द्यावे.

जर सरकारने आमच्या ५ तालुक्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही,तर मी स्वतः या पाचही तालुक्यातील हजारो शेतकरी,शेतमजूर बांधवांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून, जनआंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारला जाब विचारणार,याची नोंद महायुती सरकारने घ्यावी.

शेतकऱ्यांचा अजयभाऊंना पाठिंबा :

डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतलेल्या या आक्रमक आणि शेतकरी हिताच्या भूमिकेचे अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले असून,अजयभाऊच आम्हाला न्याय मिळवून देतील” असा विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close