गडचिरोलीसामाजिक

चंद्रपूर येथील रंजन संस्थेकडून वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी….
चंद्रपूर:- आजच्या काळात वाढते शहरीकरण, जंगलतोड, वृक्ष कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे निसर्गाचा समतोल संतुलन बिघडतोय पर्यावरण संतुलन राखण्याकरिता रंजन सामाजिक मंचच्या माध्यमातून वृक्षारोपण करून संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला.

           “जहां हरियाली, वहां खुशहाली” या म्हणीला अनुसरून वृक्षारोपण मनीष महाराज दुबे यांच्या हस्ते पार पडले.यात रंजन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, संजय कट्यारमल, सुधीर धकाते, विकास बनसोड, प्रकाश नांढा,अशोक पिंपळकर, सचिन बरबटकर, मोहन जीवतोडे,सचिन बरडे,नितीन चांदेकर, वसंत भलमे, प्रदीप गोविंदवार आदी उपस्थित होते. झाडाची देखभाल करणे, त्याची वाढ होईपर्यंत निघा राखणे हे आपले सामूहिक जबाबदारी समजावी असा संकल्प करण्यात आला.

         यावेळी तुकाराम महाराजांनी म्हटले “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” त्याच तळमळीने झाडे लावा.झाडे जगवा.पर्यावरण वाचवा. हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून भावी पिढीसाठी हिरवेगार निरोगी पर्यावरण निर्माण करूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close