अहेरीधार्मिक

हनुमान जन्मोत्सवदिनी रामय्यापेठा येथील हनुमान मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न….!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…

अहेरी : रामय्यापेठा परिसरातील नागरिकांसाठी श्रद्धा व भक्तीचे केंद्र ठरणारे हनुमान मंदिर स्थानिक नागरिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी स्वतःच्या खर्चातून उभारले आहे.या मंदिराचे लोकार्पण हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र दिवशी उत्साहात पार पडले.

यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मंदिर उभारणीमुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

अजय कंकडालवार यांनी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय स्वतःच्या खर्चातून हे मंदिर उभारले असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या या कार्यामुळे समाजात धार्मिक भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात प्रसाद वितरण करण्यात आले आणि भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी,काँग्रेसचे जेष्ठा नेते व माजी उपसरपंच अशोक येलमुले,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,संतोष वसाके,पुणेश कंदीकुरवार,राजाराम निकुरे,जुरू आत्राम,सोमेश्वर शेंडे,भगवान आदे,शंकरवार,सुरेश तोरेम,मधुकर वासके,अनुराधा सर्धार ग्रामपंचायत सदस्य,रातो आत्राम,परवता लांबडे,शारदा गुरनुले,मंदाबाई निकुरे,विनोदा तोरेम,चिन्नू ठाकरे,भीमराव,जीवन गुरनुले,बापूराव ठाकरे,सुधाकर वाडेय,स्वप्नील मडावी,सुरेश गुरनुले,महेंद्र निकोडे यांच्या सह स्थानिक गावकरी तसेच काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close