मुलचेरा

काँग्रेस नेते कंकडालवार व हनमंतू मडावी यांनी दर्शविली हळदी-कुंकू कार्यक्रमाला उपस्थिती!

दविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी…

मुलचेरा : तालुक्यातील कोपरअल्ली येथे झाडे समाजाकडून मकर संक्रांतीच्या निमित्याने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले होते.

झाडे समाजाकडून आयोजित या हळदी- कुंकू कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच आपल्यापरीने कार्यक्रमाला आर्थिक देणगी ही देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस नेते कंकडालवार व मडावी यांनी सावित्रीबाई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले यांच्या फोटोना पुष्पअर्पण करून अभिवादन करून करण्यात आली.

             यावेळी कंकडालवार यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महिला ही अबला नसून सबला आहे.आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते.संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे..महिलांनी एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीच्या बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे, असे मोलाचे त्यांनी मार्गदर्शन केले.

             झाडे समाजाकडून आयोजित हळदी कुंकूवाचा कार्यक्रमाला महिला भगिनींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close