अहेरी

काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी घरी उभारली गुढी…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…

अहेरी :  गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी सपत्नीक आज आपल्या निवासस्थानी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले.यानिमित्त त्यांनी मराठी बांधवांना आणि समस्त जनतेला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण असून,यानिमित्त घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला जातो.अजय कंकडालवार यांनीही परंपरेनुसार आपल्या घरी गुढी उभारली आणि नववर्ष सुख-समृद्धीचे जावो,अशी प्रार्थना केली.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.शहरभरात आणि ग्रामीण भागातही गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांचे मातोश्री मंदाबाई कंकडालवार,त्यांचे सुपुत्र युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अथर्व मल्लेलवार,प्रमोद गोडसेलवारसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close