चंद्रपूर

सामाजिक समरसता गतिविधी,चंद्रपूर कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…

चंद्रपूर- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता गतिविधि तर्फे चंद्रपूर येथील मुख्य मार्गावरील भारतरत्न,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंड संघचालक लक्ष्मणराव ओलालवार तसेच सामाजिक समरसता गतीविधी चे संयोजक डॉक्टर नंदकिशोर मैदंळकर व सहसंयोजक मोहन जीवतोडे हे उपस्थित होते तसेच वसंतराव थोटे, गणपतराव सत्रे, अशोक भालेराव, अरुण मदनकर, एडवोकेट आशिष धर्मपूरिवार, रामजीवन परमार, जगदीश मूडपल्लीवार, मनीष दुबे, सुधीर मिसार, एडवोकेट नितीन गाटकीने, एडवोकेट आशिष मुंदडा, श्रीकांत सत्रे, अजय सज्जनवार, नगरसेवक रवी लोणकर तसेच अंचचलेश्वर शाखा व श्रीराम शाखेचे मुख्यशिक्षक, कार्यवाह व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, डॉ. हेडगेवार सेवा समिती, भारतीय मजदूर संघ, ग्राहक मंच, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, धर्मजागरण, अधिवक्ता परिषद या विविध संघटनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close