धार्मिकसिरोंचा

कोटा पोचमपल्ली येथील महाकाली देवीच्या सजावटीसाठी अजयभाऊ कंकडालवार कडून दहा हजाराची आर्थिक सहाय्य…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी….

सिरोंचा : तालुक्यातील कोटा पोचमपल्ली येथील सर्वसामान्य नागरिक व भक्त जणांनी येथील पुरातन महाकाली देवीच्या नव्याने सजावटीसाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना भ्रमणध्वनी द्वारे आर्थिक सहाय्याची मागणी केले होते.

काँग्रेस नेते कंकडालवार यांनी पोचमपल्ली येथील भक्तजण व नागरिकांची सन्मान राखत त्यांनी महाकाली देवीच्या नव्याने सजावटीसाठी आपल्यापरिने ₹10000/- दहा हजार रुपये रोख रक्कम आर्थिक सहाय्य केले.

सदरहू आर्थिक सहाय्य अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंतभाऊ डुरके यांच्याहस्ते भक्तजण व गावातील नागरिकांकडे सुफुर्द करायला लावले.यावेळी गावकऱ्यांनी भक्त जणांनी कंकडालवार यांचे या धार्मिक कार्याप्रती समाधान व्यक्त केले.

येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत डुरके यांनी आर्थिक सहाय्य प्रदान करतांना मंडळाचे पुजारीसह कोरेत भीमय्या,मनोज वेलादी,बोल्ले अर्जन्ना,कोरेत श्रीनिवास,बोम्मा दशरथरेड्डी,दुर्गम शंकर,पूजा तलांडी, मोनिका वेलादी, विनित नैताम, कोरेत लक्ष्मण, भुजंगराव नैताम, महेश डुरके, नरेश दुर्गम, बापू दुर्गम आदी गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close