अहेरी

जोगनगुडा येथील आगग्रस्त बोरकूट कुटुंबाला डॉ.कंकडालवार कडून आर्थिक मदत…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…

अहेरी : तालुक्यातील जोगनगुडा येथे मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शंकर मल्ला बोरकूट यांच्या घराला अचानक भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले.या आगीत अंदाजे २ ते 3 लाख रुपयांचे रोख रक्कम,सोने-चांदी,धान्य,कपडे,भांडी तसेच घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून पूर्णत: नष्ट झाले.

सदर घरात मल्लय्या शंकर बोरकूट,प्रसादराव शंकर बोरकूट व नागेश शंकर बोरकूट अशी तीन कुटुंबे वास्तव्यास होती.घटनेच्या वेळी कुटुंबातील पुरुष शेतात झोपण्यासाठी गेले होते.त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.मात्र आग नेमकी कशामुळे लागली,याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केले मात्र आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले.

सदरहू घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी बोरकूट कुटुंबियांची आस्थेने विचारपूस करून त्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर केली तसेच शासनाकडूनही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या घटनेमुळे बोरकूट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना तातडीने शासकीय मदतीची आवश्यकता आहे.ग्रामस्थांनीही प्रशासनाने पंचनामा करून त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,लक्ष्मीस्वामी अट्टेला,शंकरीताई पोरंतेट सरपंच गोविंदगाव,शामराव गावडे,बापू गांदार्ला,बापू गांधार्ला,बापू दुर्गे,रमेश जंगम, बक्का कुमरे,परदेश तोरेम, राजेश कोंडा,वेंकटस्वामी बोरकुट,लछाया बोरकुट,रुपेंद्र तलांडी यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close