रेतीअभावी जानमपल्ली येथील घरकुलांचे बांधकाम रखडली…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी.
सिरोंचा…. रेतीअभावी विविध योजनांचे घरकुलांचे बांधकाम रखडल्याने तालुक्यातील जानमपल्ली येथील घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देण्याची मागणी सिरोंचा तालूका काँग्रेस कमिटीने केली आहे.
काल तालूका काँग्रेस कमिटीचे पदाधिकाऱ्यांनी सिरोंचाचे तहसीलदार ए.टी.सकुंदरवार व पंचायत समितीचे कक्ष अधीक्षक बनसोड यांना भेटून लाभार्थ्यांच्या समक्ष चर्चा घडवून आणत निवेदन सादर केले.
यावेळी तहसीलदार ए.टी. सकुंदरवार व कक्ष अधीक्षक बनसोड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन-चार दिवसांत जानमपल्ली येथील घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
सिरोंचाचे तहसीलदार सकुंदरवार व कक्ष अधीक्षक बावणे यांना निवेदन देतांना तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी,काँग्रेसचे नेते व माजी उपसरपंच रवी सल्लम,सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार राजन्ना तोटा सह जानमपल्ली येथील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
