एटापल्ली

काँग्रेस नेते कंकडालवार यांनी एटापल्ली येथील पत्रकारांच्या आंदोलनाला दर्शविली जाहीर पाठिंबा…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क प्रतिनिधी….

एटापल्ली : शहरातील  वर्दळीचा मुख्य रस्ता तसेच एटापल्ली-देवदा-गडचिरली,हेडरी-गट्टा तसेच एटापल्ली-जारावंडी हे रस्ते मागील अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ होत असताना अपघातांचा धोका वाढला असून पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात उडणारी प्रचंड धूळ यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.धुळीमुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना श्वसनविकार, अॅलर्जी आणि डोळ्यांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.व्यापारी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत असून ग्राहकांची ये-जा कमी झाल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

या ज्वलंत प्रश्नाबाबत वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करत एटापल्ली येथील व्हॉइस ऑफ मीडिया शाखेच्या पत्रकार संघटनेने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले असून या उपोषणामुळे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आंदोलनस्थळी विविध सामाजिक संघटना आणि नागरिक भेट देऊन समर्थन व्यक्त करत आहेत.

दरम्यान या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close