
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी
मुलचेरा….तालुक्यातील बंदूकपल्ली येथे काँग्रेस नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.
मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली येथे मागील अनेक वर्षांपासून येथील एका कुळाच्या घरामध्ये श्रीगणराया,शिवजी व हनुमानाची मूर्तिची स्थापना करून गावकरी पूजा अर्चना करित होते.परंतु कुळाचे घर जीर्ण झाल्याने पूजा अर्चना व भजन करणे धोकादायक ठरत होते.
बंदूकपल्ली येथील गावकरी व भक्तजणांनी काँग्रेस नेते कंकडालवार यांची भेट घेऊन गावासाठी स्व:खर्चाने मंदिराचे बांधकाम करून देण्याची विनंती केली होती.
बंदूकपल्ली येथील गावाकऱ्यांच्या व भक्तजणांच्या विनंतीला मान देऊन कंकडालवार यांनी मंदिराचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते.काल गावकऱ्यांनी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमाला कंकडालवार यांनी उपस्थित राहून स्वहस्ते मंदिराचे भूमिपूजन केले होते.यावेळी काँग्रेस नेते हणमंतू मडावी सुद्धा हजर होते. मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रमाला गावकरी व भक्तजन मोठ्या संख्यने उपस्थित होते.
एकंदरीत मंदिर बांधकाम भूमिपूजनाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी गावकरी व भक्तजणांनी कंकडालवार यांच्या धार्मिक सत्कार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनपूर्वक आभार मानले.

